You are currently viewing सावंतवाडी न.प.च्या कंत्राटी कामगाराचे निधन

सावंतवाडी न.प.च्या कंत्राटी कामगाराचे निधन

कुटुंबियांना न्याय देणार – नगराध्यक्ष

सावंतवाडी

सावंतवाडी पालिकेचे कर्मचारी संजय वारंग यांचे निधन झाल्याची घटना ताजी असतानाच काही तासांच्या फरकाने दुसऱ्या कंत्राटी कर्मचा-याचे निधन झाल्यामुळे पालिका प्रशासनावर शोककळा पसरली आहे. कमलेश परब असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, याबाबत नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी शोक व्यक्त केला असून संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करेन,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकाच वेळी दोन्ही घटना घडल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित दुसरा कर्मचारी हा आरोग्य विभागातील आहे. त्याला दोन दिवसापूर्वी ताप आला होता. त्याच्यावर अधिक उपचार सुरू होते. पालिकेत तब्बल तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते.त्यातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा