जिल्ह्यातील कोविड उपाययोजनांचा खा. विनायक राऊत यांनी घेतला आढावा

जिल्ह्यातील कोविड उपाययोजनांचा खा. विनायक राऊत यांनी घेतला आढावा

 *ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न*

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड उपाययोजना संदर्भात  जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आढावा बैठक घेतली. कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरचा आढावा यावेळी घेण्यात आला. कोविड टेस्टचे काही रिपोर्ट प्रलंबित आहेत. ते ३० एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या.

तसेच  कोविड  रुग्णांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन, औषध पुरवठा, डॉक्टर नर्स आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता, रुग्णवाहिका, ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता, कोविड लसीकरण, याबाबत सद्यस्थितीची माहिती घेण्यात आली. परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर इतर आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, औषध निर्माता अनिल देसाई आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा