You are currently viewing सिंधुदुगातील रस्त्यांसाठी केंद्राकडून मोठा निधी मंजूर…

सिंधुदुगातील रस्त्यांसाठी केंद्राकडून मोठा निधी मंजूर…

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली :

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यामधील रस्त्यांसाठी कोट्यावधींच्या निधीची घोषणा केलीय. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्ते व पुलांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वेंगुर्ला-आकेरी-आंबोली-बेळगाव रस्ता एसएच 180 दुरुस्तीसाठी 3.41 कोटी
मंजूर करण्यात आले असून आडेली- वज्राट-तळवडे – मातोंड- आजगाव रस्ता दुरुस्तीसाठी 1.46 कोटी तर ओझर-कांदळगाव-मगवणे-मसुरे-बांदीवडे-आडवली-भटवाडी रोडवरील पुलांच्या बांधकामासाठी 3..82 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या कामांसाठी मोठा निधी मंजूर झाल्यामुळे विविध तालुक्यांमधील रस्ते प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील ज्या ७ जिल्ह्यांमधील रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर केलाय त्यात नाशिक, पुणे, वाशिम, सोलापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि लातूरचा समावेश आहे. नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याने या जिल्ह्यांमधील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील वाहतूक अधिक वेगवान होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =