कुडाळ
कुडाळ शहरातील सिंधुरत्न कॉम्प्लेक्समध्ये ७० वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका सुजाता प्रभाकर अणावकर या मृत अवस्थेत आढळून आल्या कॉम्प्लेक्स मधील नागरिकांना मृतदेहाचा वास आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी या मृतदेहाची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली असता ही वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचे उघड झाले ही वृद्ध महिला एकटीच राहत होती.
सिंधुरत्न कॉम्प्लेक्समध्ये सेवानिवृत्त शिक्षिका असलेल्या सुजाता अणावकर या वृद्ध महिला अनेक वर्षे या ठिकाणी राहत आहेत त्या एकट्याच राहत होत्या २१ एप्रिल रोजी यांना कॉम्प्लेक्स मधील काही लोकांनी बघितले. त्यानंतर मात्र त्यांच्या फ्लॅटचे दार उघडले नाही. दरम्यान आज (सोमवारी) त्यांच्या फ्लॅटमधून वास येण्यास सुरुवात झाला त्यामुळे आजूबाजूच्या फ्लॅट धारकांनी कुडाळ पोलीस ठाण्याची संपर्क साधला कुडाळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन त्या फ्लॅटचा दरवाजा उघडून आत पाहिले. तर या वृद्ध महिला मृत अवस्थेत होत्या दरम्यान पोलिसांनी आरोग्य विभागाला बोलून त्या वृद्ध महिलेची तपासणी केली असता ती कोरोना बाधित असल्याचे उघड झाले त्या अणाव येथील रहिवासी आहेत त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.