You are currently viewing आचऱ्यातील शासकीय विश्रामगृहात कोविड उपचार केंद्र सुरू करा….

आचऱ्यातील शासकीय विश्रामगृहात कोविड उपचार केंद्र सुरू करा….

मालवण पं. स. उपसभापती राजू परुळेकर यांची मागणी ; तहसीलदारांना निवेदन सादर

मालवण
जिल्ह्यासह मालवण तालुक्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील आचरा येथील शासकीय विश्रामगृहाची सर्व सोयींनी युक्त असलेली इमारत ताब्यात घेऊन याठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी पंचायत समिती उपसभापती राजू परुळेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सर्वच ठिकाणी कोव्हीड १९ च्या आजाराने थैमान घातल्याने दिवसेंदिवस पेशंट फार मोठया प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे जास्तीस जास्त उपचार केंद्र असणे आवश्यक आहे. आचरा येथील शासकिय विश्रामगृह सध्या वापरात नाही. सदरचे विश्रामगृह सर्व सोईनी सुसज्य आहे. त्यामुळे हे शासकिय विश्रामगृह आपण आपल्या ताब्यात घेवून त्या ठिकाणी नवीन कोव्हीड १९ उपचार केंद्र सुरु करण्यात यावे. त्यामुळे आचरा व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आचरा शासकिय विश्रामगृहात तात्काळ कोव्हीड- १९ उपचार केंद्र सुरु करण्याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच त्याठिकाणी एक वाहन वाहनचालकासह उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा