You are currently viewing देवगड येथील १०० बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

देवगड येथील १०० बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

देवगड

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतुन देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने 50 बेडचे कोविड आयसोलेशन सेंटरचा शुभारंभ प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते फित कापून, व देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा सौ प्रियांका साळसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

देवगड तहसीलदार इमारतीच्या मागील बाजूस नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकल्यान विभागाच्या वसतिगृहाची नव्या इमारतीमध्ये हे कोविड आयसोलेशन सेंटर आज पासून सुरू करण्यात आले आहे.जवळपास 120 पेक्षा जास्त बेडची आसनक्षमता असलेली ही वसतिगृहाची इमारत देवगड तालुक्यातील कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात आली.

यामध्ये नगरपंचायत कार्यक्षेत्रासाठी 50 बेडचे तर उर्वरित तालुक्यासाठी हे कोविड सेंटर कार्यरत असणार आहे.यापूर्वी देवगड जामसंडे येथे असलेले कोविड केअर सेंटर बंद करून यामधील कोविड पेंशट हे या नवीन केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी दिली.तर देवगड शेठ म ग हायस्कूल येथील जागा कोविड सेंटरसाठी राखीव ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, नायब तहसीलदार गवस, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष कोंडके, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ विटकर, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, जिल्हा चिटणीस बाळा खडपे, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, शिक्षण व आरोग्य सभापती संजय तारकर, नगरसेवक उमेश कणेरकर, योगेश चोदोसकर, बापू जुवाटकर, विकास कोयडें,  गणपत गावकर, ज्ञानेश्वर खवळे, नगरसेविका प्रणाली माने, प्राजक्ता घाडी, उष:कला केळुसकर, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + nineteen =