You are currently viewing संदेश निकम मित्रमंडळामार्फत अन्नधान्याचे वितरण

संदेश निकम मित्रमंडळामार्फत अन्नधान्याचे वितरण

वेंगुर्ले
कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने शासनाच्या नियमांनुसार कंटेनमेंट झोन केलेल्या कलानगर व पिराचीगल्ली भागातील गरीब व मोलमजुरी करून कुटुंबाचा चरीतार्थ चालविणाऱ्या 22 सर्वसामान्य कुटुंबांना 15 दिवसांच्या कालावधीत उपासमार होऊ नये. यासाठी गतवर्षीप्रमाणे संदेश निकम मित्रमंडळाने दरदिवशी लागणा-या सर्व चीज वस्तुचे 15 दिवस पुरेल एवढे पॅकेज करून ते आज रविवारी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल, यांच्या प्रमुख उपस्थितीत या भागाच्या नगरसेविका तथा संदेश निकम मित्रमंडळाच्या अध्यक्षा सुमन निकम व माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी वितरण केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा