ऑनलाइन परीक्षा घेण्यास राज्यपालांची संमती…

ऑनलाइन परीक्षा घेण्यास राज्यपालांची संमती…

उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती…

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज संध्याकाळी राज्यपालांची परीक्षा नियोजन संदर्भात भेट घेतली. यावेळी अंतीम वर्षाच्या आणि इतर सर्व परिक्षा ऑनलाइन घेण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संमती दाखवली आहे.
विविध विद्यापीठाच्या कुलगुरू सोबत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला होता. तो आढावा सांगण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संमती दाखवली आहे. यावेळी परीक्षांच्या निकाला संदर्भात चर्चा झाली. सर्व विद्यापीठे वेळेवर निकाल लावण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती देण्यात आली.
गोंडवाना विद्यापीठात ऑनलाइन परीक्षा कशी घेणार हा प्रश्न होता मात्र सर्वांत आधी त्यांनीच यशस्वीरित्या ऑनलाइन परीक्षा घेतली. अशी माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा