अखेर कुडाळ मध्ये कोविड सेंटर सुरू..

अखेर कुडाळ मध्ये कोविड सेंटर सुरू..

*शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी खासदार राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांचे मानले विशेष आभार*

कुडाळ :

कुडाळ शहर विकासासाठी नेहमीच शिवसेनेने आपले महत्व पूर्ण योगदान दिले आहे. आज कुडाळ शहराच्या दृष्टीने महीला रुग्णालयात कोव्हिड सेंटर उभे करुन कुडाळ वासियांना दिलासा देण्याचे काम खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. यासाठी कुडाळ शहरवासियांच्या वतीने विशेष आभार मानत शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया: व्यक्त केली आहे.

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना उदय सामंत, आमदार वैभव नाईक, माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी कुडाळ शहरासाठी अनेक विकास कामांसाठी भरीव निधी दिला. आता तर कायमच टीका होत असलेल्या महीला रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपये निधी आणुन ते पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले. एवढ्यावरच ते थांबले नसुन आज कोरोनाच्या या महासंकटात कुडाळ येथे कोव्हिड सेंटर उभे केले हे कुडाळ शहर आणि तालुक्यातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे काम केले आहे.

यासाठी कुडाळ शहराच्या वतीने आभार मानत शिरसाट म्हणाले, कुडाळ शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जी जी मोठी कामे हाती घेतली. ती कामे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेली. कामे करताना टीका झाली मात्र या टीकेला भिक न घालता कामे पुर्ण झाली पाहिजेत आणि आपण कुडाळ वासियांना दिलेला शब्द पाळला पाहिजे. या भावनेतून आमदार नाईक यांनी काम केले. तसेच संतोष शिरसाट म्हणाले महीला रुग्णालयात कोव्हिड सेंटर सुरु केले. टीका करणारी मंडळी आता त्याठिकाणी येऊन आरोग्य अधिकारी वर्गाकडून आढावा घेत आहेत. त्यांनाही या पुढे सुबुद्धी देवोत आणि कुडाळ शहरातील विकास कामे करण्यासाठी आमदार नाईक मेहनत घेत आहेत त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शिरसाट यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा