सावंतवाडी:
राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने आज सकाळी सावंतवाडी शहरात फिरत्या दारू विक्रेत्याच्या घरात छापा टाकला.
सावंतवाडी शहरात गोवा बनावटीची करमुक्त दारू तळीरामांना घरपोच देणारे विक्रेते कार्यरत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाला मिळाली.
आज सकाळी या पथकाने शहरातील मच्छी मार्केट परिसरात एका फिरत्या दारू विक्रेत्याच्या घरात छापा टाकला. मुद्देमालासह त्याला ताब्यात घेण्यात या पथकाला यश आले.

