You are currently viewing मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली

मालवण तालुक्यातील बजेटमधील विविध रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारने दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली

*आमदार वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला यश*

 

*८ कोटी ५४ लाख ५५ हजार रु निधीच्या ५२ रस्त्यांच्या कामांचा समावेश*

 

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांसाठी ८ कोटी ५४ लाख ५५ हजार रु निधी मंजूर झाला होता. मात्र त्याच दरम्यान राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार निर्माण झाले. या सरकारमध्ये जाण्यासाठी ५० खोक्यांची ऑफर असताना देखील आ. वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षाशी गद्दारी केली नाही. शिवसेनेशी निष्ठावंत राहिले त्यामुळेच त्यांच्या मतदारसंघातील मंजूर असलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली होती. आ. वैभव नाईक यांनी विद्यमान मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेऊन विकास कामांवरील स्थगिती उठविण्याची मागणी केली मात्र ते सरकारमध्ये सामील होत नसल्याने स्थगिती कायम ठेवण्यात आली होती. तसे सूतोवाच मंत्र्यांनी केले होते. त्यामुळे मालवण वासियांवर अन्याय झाला होता. शिंदे-फडणवीस सरकार विरोधात असलेल्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र आ. वैभव नाईक यांनी पाठपुरावा सुरु ठेवला. नाईलाजाने पक्षामार्फत त्यांना कोर्टात जावे लागले. मुंबई उच्च न्यायालयात विकास कामांवरील स्थगिती उठविण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या याचिका मान्य केल्या होत्या.त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी विकास कामांवरील स्थगिती उठविण्याबाबतचे ऍफिडेव्हिट न्यायालयात सादर केले. न्यायालयाने याची दखल घेऊन शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय रद्दबातल ठरवत सर्व विकास कामांवरील स्थगिती उठविली आहे. त्याबाबतचे परिपत्रक २९ सप्टेंबर २०२३ रोजी राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयाकडून काढण्यात आले आहे. मालवण तालुक्यातील ५२ रस्त्यांच्या कामांवरील स्थगिती उठविली असून आ.वैभव नाईक यांच्या न्यायालयीन लढ्याला यश आले आहे. त्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. आता या कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

 

*आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्प (बजेट) २०२२ -२३ अंतर्गत मालवण तालुक्यातील मंजूर असलेली व स्थगिती उठविलेली विकास कामे पुढीलप्रमाणे*

 

रा. मा. १८३ पासून चाफेखोल माळगाव मार्ग इजिमा ३९ डांबरीकरण करणे २३ लाख ७५ हजार

ओसरगाव मळीसडा असरोंडी मार्ग इजिमा ३२ डांबरीकरण करणे १४ लाख २५ हजार,

कसाल हेदूळ खोटले वायंगवडे गोळवण मार्ग इजिमा ४० डांबरीकरण करणे १४ लाख २५ हजार,

चौके आंबडोस माळगाव मसुरे इजिमा ५४ डांबरीकरण करणे २३ लाख ७५ हजार

आंगणेवाडी देऊळवाडा इजिमा ३८ मध्ये संरक्षण भिंत रस्ता डांबरीकरण करणे २३लाख ७५ हजार

कोळंब सर्जेकोट मार्ग इजिमा ३६ संरक्षण भिंत रस्ता डांबरीकरण २३ लाख ७५ हजार

बिळवस प्रजीम ३२ चे बिळवस सातेरी मंदिर ग्रामा २६९ डांबरीकरण करणे. – १९ लाख

वायंगवडे कुळकरवाडी मार्ग ग्रामा ३२७ डांबरीकरण करणे – १९ लाख

मालवण तालू. किर्लोस धनगरवाडी भरवाडी ग्रामा डांबरीकरण करणे – १९लाख

असरोंडी MDR २९ ते तानकोंडं ग्रामा १२५ डांबरीकरण करणे – १९ लाख

शिरवंडे बौद्धवाडी ते रतांबेवाडी शेळेवाडी रस्ता ग्रामा १२६ डांबरीकरण करणे – १९ लाख

राठीवडे हरीजनवाडी व पुजारेवाडी ग्रामा १४७ डांबरीकरण करणे – १९ लाख

ओझर देवंडी भद्रकाली मंदिर ते कोळंब ग्रामा २३१ डांबरीकरण करणे – १९ लाख

MDRG ते ओझर खैदा साळकुंभा कुर्ले भाटले नांदरुख ग्रामा २४६ डांबरीकरण करणे- १९ लाख

MDR ३२ खैदा आचरेकर दुकान ते खैदा विठ्ठल मंदिर ग्रामा २७३ डांबरीकरण करणे- १९ लाख

गोळवण चिटमुलेवाडी ग्रामा ३१२ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

नांदोस जोडरस्ता कट्टा समादेवी ते नांदोस ग्राम पं. ग्रामा ३३८ डांबरीकरण करणे- ९ लाख ५० हजार

डिकवल वरचीवाडी ग्रामा ३२४ डांबरीकरण करणे – १९ लाख

बुधवळे पेरवाडी ग्रामा ४३४ डांबरीकरण करणे – १९ लाख

कुमामे नागिंदेवाडी ग्रामा ३२२ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

कट्टा एस टी स्टँड ते गुरामवाड रस्ता ग्रामा ३८० डांबरीकरण करणे – १९ लाख

पेंडूर खरारे रायवाडी मुगचीवाडी वेताळमंदिर ग्रामा ३७२ डांबरीकरण करणे – १९ लाख

बांदिवडे कोइळ ग्रामा ७७ डांबरीकरण करणे – १९ लाख

आंबडोस पावनवाडी ग्रामा २९५ डांबरीकरण करणे – १९ लाख

वायंगवडे ते पडोसवाडी ग्रामा १९० डांबरीकरण करणे – १९ लाख

असगणी पन्हाळवाडी ते कृषि विज्ञान केंद्र ग्रामा १०८ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

राठिवडे मुख्य ते बांबरवाडी ग्रामा १५० डांबरीकरण करणे – १९ लाख

आनंदव्हाळ, कातवड , नांदरुख ग्रामा २७८ डांबरीकरण करणे – १९ लाख

हेदुळ बौद्धवाडी मार्ग ग्रामा ३३३ डांबरीकरण करणे – १९ लाख

रामगड सांडवे ते रामगड जांभळखडी ग्रामा ११ डांबरीकरण करणे – १९ लाख

देऊळवाडी भरतेश्वर मंदिर ते मठ मार्ग ग्रामा २०९ डांबरीकरण करणे – १९ लाख

मठ.बु घाडीवाडी ते लोहारवाडी ग्रामा १६ डांबरीकरण करणे – १४ लाख २५ हजार

आडवली मालडी ग्रामा ८३ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

प्ररामा ४ ते देवली चिंचेचा व्हाळ बंडावाडा ते बावखोल रस्ता ग्रामा ४१५ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

चौके आंबेरी व्हाया बावखोल मार्ग ग्रामा ४०८ किमी डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

साळेल कुकरवाडी मार्ग ग्रामा ३९९ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

रामगड देऊळवाडी रस्ता ग्रामा ७ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

रामगड सांडवे रस्ता ते रामगड जांभळखडी रस्ता ग्रामा ११ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

श्रावण गवळीवाडी ग्रामा २४ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

पळसंब डिग्गीवाडी ग्रामा ग्रामा २४ डांबरीकरण करणे – १९ लाख

बुधवळे मळेशेतवाडी ग्रामा २८ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

आचरा पारवाडी ते साटमवाडी ते विष्णू मंदिर वायंगणकर आवार डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

आचरा हिर्ले मुणगेकर घाटी ते तुरुपवाडी रस्ता ग्रामा ४७ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

वायंगणी घाडीवाडी स्मशानभूमी ते नंददिप ग्रामा ५३ डांबरीकरण करणे – १९ लाख

चिंदर सडेवाडी ग्रामा ५९ डांबरीकरण करणे – १९ लाख

चिंदर बाजार रामा १८१ ते तळे देऊळवाडी ग्रामा ६६ डांबरीकरण करणे – १९ लाख

त्रिंबक पलीकडची वाडी ग्रामा ६८ पलीकडची वाडी डांबरीकरण करणे – १९ लाख

बांदिवडे कोईल ग्रामा ७७ रस्ता डांबरीकरण करणे – १९ लाख

आडवली मालडी ग्रामा ८३ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

बुधवळे पेठवाडी ग्रामा ४३४ डांबरीकरण करणे – ९ लाख ५० हजार

ओसरगाव मळीसडा असरोंडी मार्ग इजीमा ३२ डांबरीकरण करणे – २८ लाख ५० हजार

मालवण देवली तारकर्ली परुळे इजिमा ५१ मजबुतीकरण करणे – २८ लाख ५० हजार रु. या कामांवरील स्थगिती उठविण्यात आली असून कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा