You are currently viewing हळवल तिठाई मंदिर परिसरात वृक्षसंवर्धनाची जाणीव ठेवून वृक्ष लागवड….!

हळवल तिठाई मंदिर परिसरात वृक्षसंवर्धनाची जाणीव ठेवून वृक्ष लागवड….!

कणकवली :

६ मे रोजी झालेल्या पर्यावरणन दिनाचे औचित्य साधून हळवल परबवाडी ग्रामस्थांनी हळवल गावचे ग्रामदैवत तिठाई मंदीर, येथे वृक्षसंवर्धनाची जाणीव ठेवून मंदिर परिसरात झाडांची लागवड केली. तसेच लावलेली झाडे जोपासना करण्यासाठी झाड दिलेल्या दात्यांनी सदर च्या झाडाचे पालकत्व घेऊन सदर लावलेले झाड हे जोपासना करण्याची जबाबदारी घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला.

झाड लावून त्याची जोपासना करून मोठे करण्याची जबाबदारी सदर वृक्षदात्यांनी घेतली. हा एक आगळा वेगळा उपक्रम राबविताना आनंद होत असल्याचे वृक्ष दात्यांनी सांगितले.

यावेळी हळवल परबवाडी ग्रामस्थ सुभाष सीताराम परब, सुभाष भागोजी परब, विजय रघुनाथ परब, सत्यवान गावडे, वामन परब, राजू गावडे, प्रदिप गावडे, बाळा राऊळ, प्रशांत परब, मंगेश गावडे, राजू परब आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा