सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात सध्या कोविड – 19 च्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे राज्यात कोविड – 19 ची दुसरी लाट आलेली दिसून येत आहे व त्या अनुषंगाने मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत योग्य नियोजन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्यातील मेडिकल ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणेबाबत कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
ज्या उद्योगधंद्यांमध्ये उत्पादनासाठी ऑक्सिजन वापरण्यात येतो, अशा सर्व उद्योगांना ऑक्सिजन पुरवठा करणे थांबविण्यात यावा ( वैद्यकीय सेवा देणारे उद्योग वगळून). तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये आपत्कालीन परिस्थिती वगळता ऑक्सिजन आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच इतर अनुषंगीक बाबी शक्य होईल तितके दिवस पुढे ढकलण्याबाबत कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.