You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लवकरात लवकर एसडीआरएफ निधी द्यावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लवकरात लवकर एसडीआरएफ निधी द्यावा

*आ. वैभव नाईक यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी*

सिंधुदुर्ग :

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. आमदार वैभव नाईक यांची ही मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोकण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व एसडीआरएफ चे सचिव असीम गुप्ता यांना सदर निधी सिंधुदुर्गला लवकरात लवकर देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिले आहेत.

कोविड साठी प्रत्येक जिल्ह्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग मधील कोविड केअर सेंटर मध्ये रुग्नांना जेवण, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य विषयक साहित्य खरेदी आदीसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या कोविड रुग्णांचे प्रमाण वाढत असून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  जास्तीत जास्त राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) सिंधुदुर्ग जिल्ह्याला देण्यात यावा. अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =