You are currently viewing माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांना बंधूशोक

माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांना बंधूशोक

वैभववाडी
एडगांव फौजदारवाडी येथील दामोदर दत्‍ताराम रावराणे वय 72 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे ज्येष्ठ बंधू होतं. दामोदर रावराणे यांचा मुंबईत सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्यात मोठा सहभाग होता. मुंबई भांडुप येथील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ व भावजय, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =