या देशांनी घातली भारतातून येणाऱ्यांवर बंदी; पुन्हा उद्रेक कोरोनाचा

या देशांनी घातली भारतातून येणाऱ्यांवर बंदी; पुन्हा उद्रेक कोरोनाचा

भारतात कोरोनाचा कहर वाढत असल्याने अनेक देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातली..

 

भारतातील कोरोना स्फोटामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. देशातील कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता आता जगभरातून भारतावर प्रवास बंदी घातली जात आहे. अमेरिका, यूके ते  पाकिस्तान आणि हाँगकाँग या छोट्या देशांचा देखील या यादीत समावेश आहे. भारतातील वाढत्या घटनांवर सर्वांनी चिंता व्यक्त केली असून प्रवाशांवर विविध निर्बंध लादले गेले आहेत.

 

रविवारी रात्री भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर हाँगकाँग सरकारने बंदी घातली होती. जारी केलेल्या आदेशात असे स्पष्ट केले होते की, 14 दिवस भारतातून हाँगकाँगसाठी कोणतीही उड्डाण होणार नाहीत. हे निर्बंध हाँगकाँग सरकारने काल 20 एप्रिलपासून लागू केले आहे. मुंबईहून हाँगकाँगला आलेले काही प्रवासी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले तेव्हा हा कठोर निर्णय घेण्यात आला. यापूर्वी वाढती घटना लक्षात घेता भारताकडून हाँगकाँगकडे जाणारी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. यावेळी होणारा धोका लक्षात घेता हे आदेश देण्यात आले आहेत.

 

त्याचबरोबर शेजारी देश पाकिस्ताननेही भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर दोन आठवड्यांची बंदी घातली आहे. तेथील सरकारच्या वतीने भारताला ‘सी’ वर्गात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की दोन आठवड्यांसाठी हिंदुस्थानला ‘सी’ वर्गात स्थान देण्यात येईल, तेथून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी असेल.

 

*यूकेने लादले निर्बंध*

 

युकेकडूनही 23 एप्रिलपासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. त्यांच्यावर सर्व प्रकारचे निर्बंध लादले गेले आहेत. त्याचबरोबर, यूके नागरिकांना ज्यांना भारतातून त्यांच्या देशात परत यायचे आहे, त्यांना देखील 11 दिवसांसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाईऩ ठेवण्यात येईल.

 

बिघडती परिस्थिती पाहता अमेरिकेचे बिडेन सरकारही आता हरकतीत आले आहे. रोग नियंत्रण केंद्राने भारताला ‘लेव्हल 4’ मध्ये ठेवण्यात आले आहे आणि सर्व नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत भारतात न जाण्याचे आवाहन केले आहे. असा युक्तिवाद केला जात आहे की भारतातील कोरोनाची अवस्था भयानक आहे आणि लस घेतलेल्या प्रवाश्यांनाही या विषाणूची लागण होऊ शकते.

 

एकदा कोरोनापासून मुक्त झालेल्या न्यूझीलंडलाही भारतातील दुसर्‍या लाटेची भीती वाटत आहे. चिंता देखील वाढली आहे कारण 8 एप्रिल रोजी भारतातून न्यूझीलंडला आलेले बरेच प्रवासी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. एकूण 23 पैकी 17 जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला होता.

 

*युएईकडून कोणतीही बंदी नाही*

 

भारतासाठी दिलासा देणारी बातमी ही आहे की युएईने आतापर्यंत कोणतीही प्रवास बंदी घातलेली नाही, परंतु एअर इंडिया एक्स्प्रेसच्या एअरलाइन्सकडून असे सांगितले गेले आहे की दुबईला जाणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना आता कोविड रिपोर्ट दर्शवावा लागेल. 48 तासांपूर्वी केलेली आरटीपीसीआर चाचणी सक्तीची असणार आहे. आज २२ एप्रिलपासून नवीन आदेश लागू होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा