You are currently viewing सावंतवाडीत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट सुरूच

सावंतवाडीत विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट सुरूच

एका नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सावंतवाडी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून कडक संचारबंदीचे निर्बंध लागू केले असतानाही त्याचे उल्लंघन करीत अकारण फिरण्यासाठी येणाऱ्याना आळा घालण्यासाठी सावंतवाडीत चिटणीस नाक्यावर अशा लोकांची रॅपिड टेस्ट केली जात आहे.

सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत या ठिकाणी जातीने लक्ष देत असून सकाळपासून केलेल्या टेस्ट अंतर्गत एका नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर ,वाहतुक पोलीस आबा पिळणकर, सखाराम भोई, सुनिल नाईक यांच्यासर आरोग्य अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − five =