You are currently viewing मनसे नेते अमित ठाकरे ५ जुलै पासून कोकण दौऱ्यावर – आशिष सुभेदार

मनसे नेते अमित ठाकरे ५ जुलै पासून कोकण दौऱ्यावर – आशिष सुभेदार

महाविद्यालयीन तरुण-तरुणींशी संवाद साधणार…

सावंतवाडी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे सात दिवस कोकणाच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणींशी श्री ठाकरे संवाद साधणार आहेत, अशी माहिती सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिली. तर सिंधुदुर्गात ५ व ६ जुलैला ते येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सुभेदार यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

अमित ठाकरे यांचा हा झंझावात आता कोकणात धडकणार आहे . ५ जुलै ते ११ जुलै असा ७ दिवसांचा कोकण दौरा अमित ठाकरे करणार आहेत . या दौऱ्यात सिंधुदुर्गात दोन दिवस (५,६) , रत्नागिरीत दोन दिवस ( ७,८) आणि रायगडमध्ये तीन दिवस ( ९,१०,११ जुलै ) असे एकूण ७ दिवस अमित ठाकरे तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणी यांच्याशी संवाद साधणार आहेत.त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू केली जात आहे .

तर दुसरीकडे अमित ठाकरे जिल्ह्यात येणार म्हणून कोकणातील महाराष्ट्र सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.अमित ठाकरे यांच्या कोकण दौरा यशस्वी व्हावा म्हणून सिंधुदुर्ग , रत्नागिरी आणि रायगड या प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठका नियमितपणे सुरू आहेत. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी अमित ठाकरे यांना भेटू शकतील , त्यांच्याशी संवाद साधू शकतील अशा पद्धतीने हे नियोजन सुरू आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − one =