अदिती सावंत हिचे राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेत सुयश
अदिती सावंत

अदिती सावंत हिचे राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेत सुयश

तळेखोल गावाची कन्या व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेखोल नं.1 ची विध्यार्थीनी अदिती संदीप सावंत हिने बाल साहित्यिक समृद्धी..एक शिक्षण चळवळ, नाशिक आयोजित भव्य राज्यस्तरीय बाल काव्य लेखन स्पर्धेत राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला.

अदिती सध्या इयत्ता तिसरी शिकत असून तिने शालेय दशेत “माझे शब्द ” हा बाल काव्यसंग्रह लिहिला आहे. तीला वडील संदीप सुरेश सावंत व आई स्नेहा संदीप सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या राज्यस्तरीय यशाबद्दल सर्व स्तरावरून तीचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा