You are currently viewing जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे आमदार नितेश राणे यांनी केले कौतुक

जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे आमदार नितेश राणे यांनी केले कौतुक

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीव धोक्यात घालून प्रामाणिक काम करत आहे. कोरोनाचे रुग्ण वाचविण्यासाठी तसेच गावात कोरोना महामारी रोखण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत ही कौतुकास्पद आहे. आरोग्य यंत्रणेला हवी ती मदत करायला वैभववाडी वासियांच्या कुटुंबातील सदस्य या नात्याने मी तयार आहे. असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले आहे.

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल व नगरपंचायत प्रशासन यांनी आरोग्य यंत्रणेला मदत करून सांघिक काम करावे. अशा सूचनाही पार पडलेल्या आढावा बैठकीत दिल्या.

आ. नितेश राणे यांनी आरोग्य प्रशासनाकडून सांगुळवाडी कोवीड केअर सेंटर व कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या दिगशी गावचा आढावा घेतला. आरोग्य प्रशासनाच्या एकूण कामगिरीबाबत आमदार नितेश राणे यांनी समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा