कोरोना रुग्ण वाढीमुळे बेडची संख्या वाढविली
जिल्ह्यातील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीचा निर्णय
राणेंनी दिला जिल्हा वाशीयांना दिलासा
राणे यांच्या पडवे येथील लाईफटाईम हाॅस्पीटल मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वतंत्र कोव्हीड सेंटर मध्ये बेडची क्षमता पन्नास वरून शंभर इतकी वाढविण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हात वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेऊन संस्थापक,तथा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईफटाईम हाॅस्पीटल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेसाठी पडवे लाईफटाईम हाॅस्पीटल मध्ये कोव्हीड सेंटर सुरू केले आहे.जिल्हात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.त्यात सर्वच शासनाच्या आणि खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या कोव्हीड सेंटर मध्ये सुद्धा उपचारासाठी बेड मिळत नाहीत अशी स्थिती आहे.त्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे,सौ.निलमताई राणे,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे यांनी लाईफटाईम कोव्हीड सेंटर ची क्षमता वाढवून शंभर बेडची व्यवस्था केली आहे.