सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 409
– जिल्हा शल्य चिकिस्तक
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 7 हजार 276 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 341 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.