लगेचच आय. टी. आय. कोरोना कक्षात रवानगी
गोव्यातील डॉक्टरलाही मास्क नसल्याने 200 रु दंड; पोलिसांची कारवाई
दोडामार्ग
दोडामार्ग तालुका आरोग्य विभाग व नगरपंचायत दोडामार्ग तसेच महसूल विभागाच्यावतीने बाजारपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांची आजपासून रेपीड टेस्ट सुरू करण्यात आली. आठवडा बाजारात कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक दुकाने राहू नये, तसेच अनावश्यक लोकांनी फिरू नये, यासाठी वारंवार पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात येत होत्या. मात्र, या सूचनांचे पालन नागरिक करताना दिसून येत नव्हते. त्यामुळे आज धडक कार्यवाही करत अनेकांची भंबेरी उडाली.
आज मात्र दोडामार्गात रेपीड टेस्ट ला आरोग्य विभाग व नगरपंचायत कडून सुरुवात करण्यात आली असून दोडामार्ग मुख्य चौकात अनावश्यक फिरणाऱ्यांची रेपीड टेस्ट करण्यात येत आहे. तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व सहाय्यक निरीक्षक कुलदीप पाटील आणि सहकारी दोडामार्ग बाजारपेठेत अनावश्यक फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवुन आहेत. यावेळी दोडामार्ग महसूल नायबतहसिलदार एन. एन. देसाई, महसूल सहाय्यक सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.
सकाळी दोडामार्ग नगरपंचायतच्या वाहनातून सावधानातेच्या सूचना दिल्या जात होत्या तरीही ग्रामस्थ बाजारपेठेत फिरताना आढळून आले होते. याची तपासणी करण्यात आली असल्याने अचानकपणे बाजारपेठेत गर्दी कमी झाली.