You are currently viewing न्हावेलीत covid-19 संशयित रुग्ण

न्हावेलीत covid-19 संशयित रुग्ण

सोशल मीडियावरील वृत्ताने गावात भीतीची छाया; ग्रामपंचायत सुशेगाद..

सावंतवाडी :

दादर – सावंतवाडी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या संशयित covid-19 रुग्ण सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या न्हावेली गावात असल्याचा मेसेज सोशल मीडिया वरून पोचल्याने न्हावेली गावात भीतीची छाया पसरली आहे.

सावंतवाडी चे तहसीलदार यांच्याशीही गावातील जागृत रहिवाशांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सक्त सूचना दिल्या असताना सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातील ग्रामपंचायत मात्र याबाबत कमालीची अनभिज्ञ आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 8 =