शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातर्फे 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध – जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातर्फे 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध – जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळातर्फे 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध – जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर

सिंधुदुर्गनगरी  :- 

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत गट कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज गटांसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी 10 लाख आणि बीज भांडवल कर्ज योजनेमध्ये 5 लक्ष रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गिय आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर यांनी दिली.

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती पुढील प्रमाणे आहे. बीज भांडवल कर्ज योजना, या योजनेमध्ये कर्जाची मर्यादा 5 लाख रुपये असून कर्जाची मुदत 5 वर्षे आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहाभाग 75 टक्के तर लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर 6 टक्के व्याज आकारले जाते व बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेच्या नियमानुसार व्याज आकारणी केली जात. या योजनेअंतर्गत कर्ज जिल्हा कार्यालय येथे उपलब्ध आहे. सन 2020-2021 या वर्षाकरीता बीज भांडवल योजनेचे भौतिक उद्दीष्ट 65 असून आर्थिक उद्दीष्ट 49 लाख रुपये आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, या योजनेअंतर्गत 10 लाख रुपये इतक्या कर्जाची मर्यादा असून ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते आहे. सन 2020-2021 या वर्षाकरिता भौतिक उद्दीष्ट 160 असून आर्थिक उद्दीष्ट 182. 40 लाख रुपये आहे. यामध्ये व्याज परताव्याची रक्कम आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास 12 टक्के पर्यंतचे व्याज लाभार्थीच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर ‘व्याजपरतावा’ मध्ये नाव नोंदणी करुन सादर करावयाचे आहेत.

गट कर्ज परतावा योजना, ही योजना गटांसाठी असून या योजनेची मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे. गटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन 202-2021 या वर्षाकरिता  भौतिक उद्दीष्ट 30 असून आर्थिक उद्दीष्ट 172.50 लाख रुपये आहे. व्याज परताव्याची रक्कम ही या योजनेमध्ये समाविष्ट आहे. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास 12 टक्के पर्यंतचे व्याज लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटवर ‘व्याजपरतावा’ मध्ये नाव नोंदणी करुन सादर करावयाचे आहे.

थेट कर्ज योजना, या योजनेत कर्जाची मर्यादा 1 लाख रुपये असून मुदत 4 वर्षाची आहे. महामंडळाकडुन ही योजना बिनव्याजी असून मुदतीत कर्ज भरल्यास 4 टक्के व्याजदर आकारण्यात येतो. या योजनेकरिता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अट 1 लाख रुपये आहे. तसेच अर्जदाराचा सिबील स्कोर कमीत कमी 500 असणे आवश्यक आहे. सन 2020-2021 या वर्षाकरिता बीज भांडवल कर्ज योजनेचे भौतिक उद्दीष्ट 120 असून आर्थिक उद्दीष्ट 120 लाख रुपये देण्यात आले आहे.

या सर्व कर्ज योजनांच्या अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, (अे) विंग, तळमजला, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग फोन क्र. 02362- 228119 येथे संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा