आरोग्य विभागाची कार्यवाही : अनेकांचे दणाणले धाबे
सावंतवाडी
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरामध्ये कडक अंमलबजावणी करण्यात आली असतानाही अनावश्यक फिरणाऱ्याना ताब्यात घेत आता त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. कणकवली कुडाळनंतर आता सावंतवाडी शहरामध्येही ही टेस्ट चालू करण्यात आली आहे.
संचारबंदी काळात वैद्यकीय सेवा, मेडिकल व दूध व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून काटेकोर दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी मुख्य चौकात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.