You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील माध्य शिक्षकांच्या कोविड ड्युट्या रद्द होणार…

दोडामार्ग तालुक्यातील माध्य शिक्षकांच्या कोविड ड्युट्या रद्द होणार…

शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन यशस्वी…

तळेरे

माध्यमिक शिक्षकांवर होणा-या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक भारती संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे.शाळा सुरू असताना ही फक्त दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना चेकपोस्ट ड्युटीवर लावण्यात आले या विरोधात आज तहसिलदार कार्यालयासमोर शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार धरणे आंदोलन छेडणार आले. त्यानंतर तहसीलदार यांनी सोमवारी ड्युट्या रद्द करीत असल्याचे लेखी आदेश काढण्याचे आश्वासन दिल्याने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करीत शिक्षक भारती शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी झाली आहे.

…तर कोवीड ड्युटीवर सामुहिक बहिष्कार घालू-
संजय वेतुरेकर

कोविड आपत्ती व्यवस्थापन काळात जिल्ह्यातील आमच्या माध्यमिक शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला वेळप्रसंगी अगदी जीव धोक्यात घालून चेकपोस्ट, रेल्वेस्थानकावर, प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच पोलिसांच्या आणि आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत सहकार्य केले आहे.
सध्या दिड वर्षांनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षणापासून दुरावत चाललेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकवर्ग संस्था कसोशीने प्रयत्न करत आहे.यापुढे तरी शिक्षका अध्यापन कार्यासाठी मुक्त करा इतकी माफक मागणी जर शासन मान्य करीत नसेल तर आणि कोविड ड्युटीला शिक्षकांना पुन्हापुन्हा काढले तर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामुहिकपणे बहिष्कार घालणार असल्याचा इशारा संजय वेतुरेकर यावेळी दिला.
या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, महिला आघाडी जिल्हा सचिव प्रगती आडेलकर सहसंघटक संतोष वैज, जिल्हा पदाधिकारी युवराज सावंत, तालुकाध्यक्ष शरद देसाई, तालुका सचिव श्रीनिवास शिंगे, कृष्णा नाईक, शिक्षकेतर कर्मचारी विष्णू लोंढे, संतोष मेथे, योगेश गावित, निवेदिता नारकर, सतीश धर्णे,अरुण गवस राजन कासार, शिवाजी वांद्रे यांच्यासह अन्य ३० ते ३५ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.संस्था प्रतिनिधी भाई परमे व शिवशंभू प्रतिष्ठानचे प्रविण गवस यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा