नेरूर येथील विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

नेरूर येथील विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ :

आदर्श युवा कला, क्रिडा मंडळ नेरूर आदर्शनगर आयोजित वकृत्व, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती मंडळाच्या वतीने बुधवारी साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधुन मंडळाने शालेय मुलांसाठी वकृत्व, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते. वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेयश चव्हाण व द्वितीय वैष्णवी नेरूरकर, निबंध स्पर्धा प्रथम देवांग चव्हाण व द्वितीय प्रज्ञा नेरूरकर, हस्ताक्षर स्पर्धा प्रथम विशाखा धामापुरकर व द्वितीय गायत्री धामापुरकर यांनी मिळविला. या स्पर्धामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तु देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुंदर चव्हाण, उपाध्यक्ष देवेंद्र नेरूरकर, सचिव श्याम चव्हाण, खजिनदार अक्षय नेरूरकर, सहसचिव हर्षद नेरूरकर, सह खजिनदार मंदार चव्हाण, विनायक चव्हाण, रोशन चव्हाण, ललित चव्हाण, आशिष नेरूरकर, अभिषेक नेरूरकर, प्रशांत नेरूरकर, न्हानु नेरूरकर, बाबली नेरूरकर, राम नेरूरकर, प्रकाश चव्हाण, जयवंत चव्हाण, रामचंद्र नेरूरकर, राजेंद्र धामापुरकर, बाळा काळसेकर आदिंसह मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व समाजबांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा