You are currently viewing अनावश्यक फिरणाऱ्यांची कणकवली चौकात सुरू झाली रॅपिड टेस्ट

अनावश्यक फिरणाऱ्यांची कणकवली चौकात सुरू झाली रॅपिड टेस्ट

एक जण मिळाला कोरोना पॉझिटिव्ह

कणकवली
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरामध्ये कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठी फिरण्याना मुभा असताना अनावश्यक फिरणाऱ्याना ताब्यात घेत त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. यात आतापर्यंत एक जण पॉझिटिव्ह ही सापडला आहे.

कणकवली शहरामध्ये वैद्यकीय मेडिकल व दूध सेवा वगळता इतर सर्व स्थापना बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आरोग्य व पोलिस प्रशासनाकडून काटेकोर दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी मुख्य चौकात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. शहरातील मुख्य चौकात आरोग्य विभागामार्फत रॅपिड टेस्ट केली जात असून शहरात अनावश्यक फिरत असणाऱ्यांना ताब्यात घेत त्यांची रॅपिड टेस्ट केली जात आहे. त्यामुळे अनावश्यक फीरणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा