You are currently viewing शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे कणकवलीत जंगी स्वागत 

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे कणकवलीत जंगी स्वागत 

कणकवली

युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमानिमित्त शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांकडून पुष्पहार घालून त्यांचे जंगी स्वागत केले. आता थोड्याच वेळात आ.भास्कर जाधव यांची तोफ कणकवलीत धडाडणार आहे.ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
याप्रसंगी खासदार विनायक राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेनेचे अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,बाळा भिसे,बंडू ठाकूर,कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,अतुल बंगे, राजू गवंडे, मंगेश सावंत, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, महेश देसाई,संतोष परब, संजय पारकर,गंगाराम सडवेलकर, आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा