मुंबई: कोरोना रोगाचा प्रसार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना रोगामुळे लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रोगावरील उपाय म्हणून रेमडेसीव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा होत असल्यामुळे उच्च न्यायालयाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे.
सामान्य रुग्णांना वेळेवर दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. याबाबत न्यायालायने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतल्याची माहिती समोर येताना दिसत आहे. दिवसाला ९०० ऑक्सिजन सिलिंडर उत्पादित होऊ शकतील असा प्लांट तयार करण्याचे आदेश उच्च न्यायालायने दिले आलेत. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्याची सूचना उच्च न्यायालयाने दिली आहे.
शहरात ऑक्सिजन सिलिंडरची कमी निर्माण झाली आहे. त्याबाबत उच्च न्यालयाने लवकरच सुनावणी घेतली आणि त्यावर हा निर्णय दिला आहे. ऑक्सिजन
प्लांटच्या बाबतीत न्यायालयाने शासनाला लक्ष घालून पावले उचलण्यात यावीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता ऑक्सिजन सिलिंडरचा प्रश्न निकाली निघतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा हा विषय ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील कोविड सेंटरमधील रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी ठाकरे सरकारकडून सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. परंतु वाढती रुग्णांची संख्या पाहता ऑक्सिजन सिलिंडर कमी पडत आहेत.