ज्ञानेश्वर सावंत यांचेकडून बांदा केंद्रशाळेला साडेसहा हजारांची मदत..

ज्ञानेश्वर सावंत यांचेकडून बांदा केंद्रशाळेला साडेसहा हजारांची मदत..

बांदा

बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री ज्ञानेश्वर पांडुरंग सावंत यांनी बांदा शाळेच्या रंगरंगोटी कामासाठी ६५००रूपयांची देणगी दिली.
बांदा केंद्रशाळा गेल्या वर्षभरात रंगरंगोटी करून आकर्षक बनविण्यात येत आहे
बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत यांनी बांदा शाळेच्या व्हर्चुअल क्लासरुमची रंगरंगोटी करणेसाठी आलेल्या ६५००रुपयांच्या खर्चाची रक्कम मुख्याध्यपक सरोज नाईक यांचेकडे सावंत यांची पत्नी सुप्रिया ज्ञानेश्वर सावंत व कन्या प्रांजल हिने सुपूर्द केली. यावेळी पदवीधर शिक्षिका उर्मिला मौर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, रुईजा गोल्सलवीस, रंगनाथ परब, श्री जे.डी. पाटील आदी उपस्थित होते.
बांदा केंद्रशाळेत लोकसहभागातून लाॅकडाऊन कालावधीत रंगरंगोटी व भौतिक सुविधा पूर्ण करणेचे काम पूर्णत्वास येत असून या या कामासाठी बांदा ग्रामस्थांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. बांदा शाळेचे माजी विद्यार्थी सार्वजनिक मंडळे,पालक व ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक योगदान मिळत असून शाळेचे रुपडे बदलत चालले आहे
सावंत कुटुंबियांनी केलेल्या या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान व पालक वर्गाकडून कौतूक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा