You are currently viewing कुडाळ तालुक्यात आज नव्याने 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

कुडाळ तालुक्यात आज नव्याने 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

कुडाळ

कुडाळ तालुक्यात रविवारी दिवसभरात 30 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या 219 वर पोहोचली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आज नव्याने 30 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात अणाव 2, ओरोस 4, कसाल 6, घोडगे 1, कडावल 2, कुडाळ 4, पिंगुळी 3, वाडीवरवडे 1, टेंबधुरीनगर 1, आकेरी 2, माणगाव 1, नेरुर 1, व गांधीनगर 2, असे रुग्ण आढळले. तालुक्यात आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1820 एवढी झाली आहेत त्यातील 1547 रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती गोळा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदेश कांबळे यांनी दिली. वाढत्या रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खाते आणि नगरपंचायत मार्फत उपाय योजना केल्या जात आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =