You are currently viewing लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांची होणारी गैरसोय दूर करावी

लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांची होणारी गैरसोय दूर करावी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.

वैभववाडी

सन २०२० हे वर्ष कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामध्येच निघून गेले. मार्च २०२० पासून कोरोना महामारीचे संकट आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी केलेले लाॕकडाऊन यामुळे संपूर्ण समाज जीवनच उद्ध्वस्त होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन, प्रशासन, कारखानदार, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, विक्रेता, शेतकरी व नोकरदार यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. या लाॕकडाऊनचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभारावी किंवा उभारली असल्यास अधिक सक्षम करावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने आपल्याकडे मेलव्दारे करीत आहोत.
सन २०२१ या वर्षाची सुरुवात कोरनामुक्तीने होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने संपूर्ण देशभर थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिनी लाॕकडाऊन अर्थात विकेंड लॉगडाऊनची घोषणा केली आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शनिवार दिनांक १० एप्रिल आणि रविवार दि.११ एप्रिल रोजी जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.परंतु या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य मजूर, कामगार व सर्वसामान्य ग्राहक यांची मात्र मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. गेल्या महिन्याभरात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. या मिनी लाॕकडाऊनचा आणि भविष्यात कडक लाॕकडाऊन पडेल या सर्वसामान्यांमधील भितीचा गैरफायदा घेऊन काही दुकानदार/व्यापारी जादा किंमतीने माल विकत आहेत. अशा परिस्थितीत जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने याबाबत स्पष्टपणे निर्देश जाहीर करावेत. सर्वसामान्य लोकांच्या मनातील भीती दूर करावी अन्यथा यामध्ये सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल होणार आहे. कोरोना संसर्गाच्या वाढीला प्रशासनाबरोबरच समाजातील काही,घटकही तेवढेच जबाबदार आहेत. स्थानिक प्रशासनाने याबाबत दक्ष राहून नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करुन नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. कोरोना महामारी आणि लाॕकडाऊनमधून सर्वांची मुक्तता होण्यासाठी प्रशासनाने व्यापारी महासंघ, ग्राहक संघटना व स्थानिक प्रशासन व लोक प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतल्यास जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो. सदर मेलची प्रत मा.पोलीस अधिक्षक,सिंधुदुर्ग, मा.जिल्हा पुरवठा अधिकारी,सिंधुदुर्ग व जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांना पाठविल्या आहेत.
तसेच ४५ वर्षावरील व्यक्तींना देण्यात येणारी कोव्हॕक्सिनची लस उपलब्ध करुन हे अभियान पुन्हा पूर्ववत करावे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर योग्य उपचार करून त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना माहिती द्यावी. काही व्यक्तींचा मृत्यू निष्काळजीपणाने झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याबाबत आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. कोरोना महामारीचे कोणीही राजकारण करु नये अशा प्रकारची विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे करीत आहोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 19 =