सिंधुदुर्गात नाविन्य पूर्ण असा पहिला उपक्रम…

सिंधुदुर्गात नाविन्य पूर्ण असा पहिला उपक्रम…

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अंशकालीन स्त्री परिचारिका यांना साड्या वाटप..

कणकवली :

आज दिनांक १० एप्रिल रोजी कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा खासदार माननीय श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसनिमित्त औचित्य साधून काल दिनांक ९ एप्रिल रोजी कणकवली पंचायत समितीमध्ये सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर तसेच  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत यांचा हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले. अंशकालीन स्त्री परिचारिका या दुर्लक्षित राहिल्या असल्याने त्यांच्या मागण्याही पुढे शासन सदरी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंशकालीन स्त्री परिचारिका 42 महिलांना जिल्हा परिषद अध्यक्षा  सौ. संजना सावंत यांच्या हस्ते तसेच कणकवलीचे सभापती व उपसभापती यांनी स्वखर्चाने साडयांचे वाटप केलेे. तसेच त्यांना पंधरा दिवसात ओळखपत्र देणार असल्याचे सांगितले.

सिंधुदुर्गात नाविन्यपूर्ण असा हा पहीला उपक्रम राबविला आणि हाच फार्मुला पुर्ण जिल्ह्य़ातील अंशकालीन स्त्री परिचारिका यांना कायमचा देणार असे ठरविण्यात आले.

यावेळी तेथे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत, कणकवली सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, सदस्य मिलिंद मेस्त्री, सुचिता दळवी, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सह.गटविकास अधिकारी अभिजित हजारे आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री. वारंग  यांनी तर आभार गटविकास अधिकारी यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा