आमचे आराध्यदैवत, कोकणचे भाग्यविधाते, आदरणीय राणे साहेबांचा आज वाढदिवस,,,,,,,,,,,,
हया राज्यातील स्वाभिमानी नेतृत्व, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली,,,,आयुष्यभर त्यांनी ह्या खडतर प्रवासात एक तत्व जोपासले व मान्यही केले ते म्हणजे माणसाने ” महत्वाकांक्षी” असावे आणि मी महत्वकांक्षी आहे,,,, “एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि धमक माझ्यात आहे ” हे स्पष्ट मत त्यांचेच आहे,,,,,,,,,,,
*राणे साहेब* हे एक वादळी व्यक्तिमत्त्व आहे आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम असणारे राजकीय नेते आहेत,प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन अस्तित्व निर्माण करणारे मोजकेच असतात,,,,,,,,,,,
हया महाराष्ट्राला मा,यशवंतराव चव्हाण, मा वसंतदादा पाटील,, मा,शरदराव पवार यांचा वारसा लाभलेला आहे आणि त्याच पंक्तीत मा,नारायणराव राणे साहेबांचे स्थान आहे,,,,,,मा,राणे साहेब हे कोकण चे वैभव व महाराष्ट्राची शान आहे,,,,स्वतःच्या भागा बद्द्ल एव्हडे प्रेम व तळमळ असणारा दुसरा नेता नाही,,साहेबां सोबत कार्यकर्ता म्हणून काम करताना, नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व काय असते ते आम्ही अनुभवत आहोत,, साहेबांची विकासाची,व्याख्या फार वेगळी आहे,,रस्ते,वीज,पाणी,हया गोष्टी होतच रहाणार,,पण माझ्या कोकणातील जनता आर्थिक सक्षम झाली पाहिजे हा ध्यास साहेबांनी व संपूर्ण राणे कुटुंबीयांनी घेतलेला आहे,सतत जनकल्याणासाठी झटणारे हे कुटुंब पाहिल्यावर असे वाटते की परमेश्वराने यांचा जन्म फक्त आणि फक्त गोरगरिबांच्या उद्धारासाठी च दिला आहे,,,,,,,,मी अनेक सभा समारंभात साहेबांचा उल्लेख माणसातील देव असा करतो अनेकांनी माझ्यावर टिका सुद्धा केली,,,परंतु मंदिरातील पाषाणातील देव पण धाऊन येण्या अगोदर,,गरीबाच्या, दिन दुबळ्या च्या हाकेला हा माणसातील देव सर्व प्रथम धाऊन येतो हे आम्ही अनुभवतो आहोत,,,,,,
कोकणातील गरीब शेतकऱ्यांची मुले शिकावीत आर्थिक सक्षम व्हावीत म्हणून साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवली,इंजिनिअरिंग कॉलेज, कृषी कॉलेज, डेरी कॉलेज,, महिलांसाठी जिजाऊ महिला भवन,,,,,तसेच शासनाकडून कोणतेही अनुदान अथवा जमीन न घेता स्वतःच्या खिशातून शेकडो कोटी खर्च करून कोकणचा मानबिंदू ठरणारे असे सुसज्ज हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभे केले आज सिधुदुर्ग सारख्या तळकोकणातील जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या तसेच कोकणातील व इतर राज्यातील तरुण तरूणी उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत,,,,,,,हे कॉलेज उभे करण्यासाठी मा,साहेब व मा,वहिनी साहेब यांनी जी प्रचंड मेहनत घेतली ,,दिवसांचे 18/18 तास हया दाम्पत्याने कॉलेज साठी कष्ट उपसले आहेत,,,,त्याचे आम्ही साक्षीदार आहोत,,,,,,,,फक्त एकच ध्येय होते,शेतकऱ्यांची गोरगरिबांची मुले डॉक्टर झाली पाहिजेत,,, माझ्या गरीब बांधवांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे,,, हेच उद्दिष्ट ठेऊन हे कुटुंब अहोरात्र काम करत आहे,,मा,साहेबांनी व राणे कुटुंबीयांनी हया कोकणातील हजारो संसार उभे केले,अनेक तरुणांना, दिन दुबळ्या ना आर्थिक पाठबळ दिले,,कोकण समृद्ध बनवले व कोकणला अशा उंचीवर नेऊन ठेवले की संपूर्ण महाराष्ट्राचा कोकणा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलुन टाकला,,,,आणि हया सर्व प्रवासात आदरणीय सौ वहिनी साहेब व निलेशजी आणि नितेशजी ची साहेबांना खंबीर साथ लाभली,,,,,,,,,,,,
राजकारणात चढ उतार हे नेहमीच येत असतात,अनेक नेत्यांच्या आयुष्यात, देवादिकांच्या, साधुसंतांच्या जीवनात सुध्दा चढ उतार आले,,,पण साहेब कधीच खचले नाहीत उलट आम्हा खचलेल्या कार्यकर्त्यां मध्ये आत्मविश्वास भरून कामाला लावले,,,,,,
आज मा राणे साहेब कोणत्याही फार मोठ्या पदावर नाहीत तरीही दर दिवशी साहेबांकडे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांची गर्दी हि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां पेक्षाही जास्त असते,,,हिच राणे साहेबांची शक्ती आहे,,,,,,,
आजच्या हया शुभदिनी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देऊन त्यांच्या सर्वं मनोकामना पूर्ण होवोत हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना,,,,,🙏🏻
शुभेछुक :संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय,, सावंतवाडी,,सिंधुदुर्ग🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹