बिबवणे येथे कलिंगड विक्री स्टॉलला कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली भेट

बिबवणे येथे कलिंगड विक्री स्टॉलला कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली भेट

शेतकऱ्यांची आपुलकीने केली विचारपूस

विकेल ते पिकेल अभियाना अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सहकार्याने कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथे मुंबई गोवा महामार्गावर शेतकऱ्यांनी उभारलेल्या कलिंगड विक्री स्टॉलला राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची आपुलकीने विचारपूस केली. शेतकरी व कृषी विभाग राबवित असलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी कौतुक केले.तसेच विकेल ते पीकेल योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढविण्याचे आवाहन यावेळी ना.भुसे यांनी केले.

याप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, विकास कुडाळकर, संतोष शिरसाट, अतुल बंगे आदीसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा