सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीनेेे सत्कार

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीनेेे सत्कार

सिंधुदुर्ग

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अंध अपंग दिव्यांग बांधवांच्या सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने कसाल येथील उद्योजक संतोष कदम यांच्या सुपुत्र तेजस याने अमेरिकेत मिळविलेल्या शैक्षणिक यशाबद्दल त्याच्या आई वडिलांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांचे हस्ते दिनांक ८ एप्रिल रोजी करण्यात आला.

यावेळी बोलताना अनिल शिंगाडे म्हणाले की कसाल गावातील तेजस याने अमेरिकेत जावून मिळविलेले यश हे आम्हा सर्वच जिल्हा वासियांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे, तो जरी आज अमेरिकेत असला तरी त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे,आईवडिलांच्या कष्टामुळे आणि संस्कारामुळेच मुळे मुले यश मिळवतात ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे, आम्ही जरी अंध, अपंग, दिव्यांग असलो तरी अशा कार्यक्रमातून आम्ही समाजातील डोळस लोकांना एक दृष्टी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.

संस्था आपल्या दारी या उपक्रमातून आम्ही समाजातील प्रत्येक घटका पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि यातून आम्ही दिव्यांग बांधव समाजातील जे लोक यश मिळवतात त्यांचं कौतुक आणि स्वतःच्या पायावर उभ राहण्याकरिता उद्योग व्यवसाय उभारा असा संदेश देणार आहोत.

यावेळी तेजसचे आई वडील संतोष कदम, डॉ श्रेया कदम, सचिन दुखंडे,गजानन हरमलकर,शामसुंदर लोट,गुरुनाथ सामंत, वर्षा वरक,सदानंद पावले, नीलम राणे आदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंध,अपंग, दिव्यांग बांधव उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा