अनुकंपा भरती प्रक्रियेद्वारे अर्पिता गांवकर यांची नियुक्ती

अनुकंपा भरती प्रक्रियेद्वारे अर्पिता गांवकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा पोलिस दलातील पोलीस नाईक आत्माराम विजय गांवकर याचे 1 जानेवारी 2021 रोजी आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अर्पिता गांवकर यांना अनुकंपा तत्वावर पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. पोलीस विभागाने अनुकंपा भरती प्रक्रिया तात्काळ राहवून श्रीमती गांवकर यांना नियुक्ती दिली आहे. यासाठी श्रीमती गांवकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, शारिरीक मोजमाप व वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्या पात्र ठरल्यानंतरप 5 एप्रिल 2021 रोजी त्यांना पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीस शिपाई पदी नियुक्ती दिली आहे. सदरचे नियुक्तीपत्र जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी अनुकंपा भरती प्रक्रिया तात्काळ राबवून श्रीमती गांवकर यांना नोकरी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधिक्षक, पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा