You are currently viewing अमेरिकीसोबतचा वाढता तणाव! जपानी समुद्रात डागले क्षेपणास्त्र; रशियाने आपली युद्ध सज्जता वाढवली

अमेरिकीसोबतचा वाढता तणाव! जपानी समुद्रात डागले क्षेपणास्त्र; रशियाने आपली युद्ध सज्जता वाढवली

अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपली युद्ध सज्जता वाढवली आहे. रशियन नौदलाच्या उत्तर फ्लिटला सक्रिय केल्यानंतर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पॅसेफिक फ्लीटलादेखील गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

मॉस्को : अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपली युद्ध सज्जता वाढवली आहे. रशियन नौदलाच्या उत्तर फ्लिटला सक्रिय केल्यानंतर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पॅसेफिक फ्लीटलादेखील गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी रशियन नौदलाच्या गाइडेड मिसाइल फ्रिगेट मार्शल शापानशिकोव्हने जपानच्या समुद्रात कॅलिबर क्रूज क्षेपणास्त्र डागले.

चाचणीसाठी क्षेपणास्त्र डागण्यात आले असल्याचे रशियाने म्हटले.

रशियन मंत्रालयाने या क्षेपणास्त्राचा व्हीडिओ ट्विट केला आहे. मार्शल शापानशिकोव्हने जपान समुद्रात केप सेर्कुम फायरिंग रेंजमध्ये पहिल्यांदाच जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कॅलिबर क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र 1000 किमी अंतरावरील लक्ष्याचे वेध घेण्यास सक्षम आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा