कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन आदेश जारी

कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन आदेश जारी

सिंधुदुर्गनगरी

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3,4 मधील तरतुदी नुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

            कलम 144 आमि रात्र संचारबंदी लागू करणे – सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात येत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 8.00 पर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा जमा होण्यास प्रतिबंध असेल. हा कालावधी वगळता उर्वरित कालावधीसाठी म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळई 7.00 पर्यंत आणि शुक्रवार रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 8.00 पर्यंत सार्वजनिक ठिकामी कोणत्याही नागरिकास वैध कारणाशिवाय फिरण्यास किंवा पुझील कारणास्तव दिलेल्या परवानगीशिवाय फिरता, वावरता (संचारबंदी ) येणार नाही. वैद्यकीय तसेच इतर अत्यावश्यक सेवा यामधून वगळण्यात येत आहेत. यासाठी होणाऱ्या हलचाली किंवा संचार ह्या प्रतिबंधीत असणार नाहीत. अत्यावश्यक सेवेमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल. रुग्णालय, रोग निदान केंद्र, क्लिनीक्स, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध दुकाने, औषध निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जसे की रेल्वे, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सार्वजनिक तसेच विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा, स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सूनपूर्व उपक्रम व सेवा, स्थानिक प्राधिकरण याद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालांची, वस्तूंची वाहतूक, शेतीसंबंधित सेवा, ई कॉमर्स, मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा.

            बाहेरील सार्वजनिक ठिकाणच्या क्रिया – सर्व समुद्रकिनारे, उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार  ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 पर्यंत आणि शुक्रवारी रात्री 8.00 ते सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यंत बंद राहतील, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळे मध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी covid-19 बाबत केलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील, स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी बारकाईने निरीक्षण केले जात आहे, याची खात्री करावी आणि अशा ठिकाणी गर्दी निदर्शनास आल्यास किंवा अभ्यागतां कडून covid-19 नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे covid-19 विषाणू संसर्गाचा धोका निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासनाकडून ही सार्वजनिक ठिकाणी तात्काळ बंद केली जातील

            दुकाने बाजारपेठा आणि मॉल्स – अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बाजारपेठा मॉल्स पूर्ण दिवस बंद राहतील, अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने ही त्यांच्या परिसरामध्ये ग्राहकांच्यामध्ये योग्य सामाजिक अंतर राखून सुरू राहतील, ज्यादा ग्राहक असतील त्या ठिकाणी चिन्हांकीत करून ग्राहकांना प्रतिक्षा कक्षात ज्या ठिकाणी पुरेसे सामाजिक अंतर राखले जाईल अशा ठिकाणी बसवले जाईल, भारत सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यावश्यक सेवा असलेल्या दुकानाचे मालक, त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग त्यांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यात यावे, सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची संवाद साधताना सुरक्षा उपायांचे जसे की पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेमेंट इत्यादीचे पालन करण्यात यावे, या आदेशाने बंद करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचे भारत सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यात यावे, तसेच दुकान मालकाने दुकानांमध्ये ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षा उपयांचे जसे की पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेमेंट पूर्वतयारी करण्यात यावी जेणेकरून शासना कडून covid-19 विषाणू संसर्गाची भीती न बाळगता सदर दुकाने सुरू करण्यावर तात्काळ निर्णय घेणे सोयीस्कर होईल

            सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुढील निर्बंधाचे पालन करत पूर्ण क्षमतेने सुरू राहील, ऑटो रिक्षामध्ये चालक आणि फक्त दोन प्रवासी, टॅक्सी, चार चाकी वाहन, चालक व वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के (आरटीओ विभागाकडील नियमानुसार), बस – आरटीओ नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील तितके प्रवासी, कोणत्याही परिस्थितीत उभा राहून प्रवास करण्यास प्रवाशांना परवानगी असणार नाही, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी काटेकोरपणे योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल, या नियमांचे उल्लंघन करणारे रक्कम रुपये 500/- दंडास पात्र राहील, चार चाकी टॅक्सीमध्ये जर एखाद्या प्रवासाने मास्क वापरला नसेल, नियमांचे उल्लंघन करणारा तो प्रवासी आणि चालक प्रत्येकी पाचशे रुपये दंडास पात्र राहतील, प्रत्येक वेळी प्रवास पूर्ण करून आलेल्या वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील, भारत सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल त्या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोरोनाचे निगेटिव रिपोर्ट प्रमाणपत्र पंधरा दिवसांसाठी वैद्य असलेले जवळ बाळगणे आवश्यक राहील, सदरचा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल. रिक्षा आणि टॅक्सीबद्दल चालकाने प्लास्टिक शीटच्या माध्यमातून स्वतःचे विलगीकरण केल्यास त्याला वरील नियमामधून सुट असेल, तपासणीमध्ये एखाद्या चालक किंवा कर्मचारी  वर्ग हा RT-PCR प्रमाणपत्र अथवा लसीकरण न घेता काम करत असलेला आढळल्यास रक्कम रुपये 1 हजार दंडास पात्र राहील, रेल्वे बाबत रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यांमधून उभा राहून प्रवास करणार नाहीत आणि सर्व प्रवासी मास्क वापरतील याची खात्री करावी, रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मास्क न वापरला असल्यास रक्कम रुपये 500/- दंड आकारला जाईल.

            कार्यालय – पुढील कार्यालय वगळता सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील, सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बँका, बीएससी एनएससी, विद्युत पुरवठा संबंधित कार्यालय, टेलिकॉम सेवा पुरवठादार, विमा आणि मेडिक्लेम कार्यालय, औषध निर्मिती करणाऱ्या उद्योगांची कार्यालयाची उत्पादनाच्या वितरणाची संबंधित व्यवस्थापनाशी निगडीत आहेत, आवश्यकता असल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आवश्यकतेनुसार एखाद्या कार्यालयास सुट देईल. सर्व शासकीय कार्यालय 50 टक्के क्षमतेनुसार सुरू राहतील. परंतु covid-19 संसर्ग रोखण्याबाबत कामकाज करणे आवश्यक असलेल्या कार्यालयांसाठी त्यांच्या विभाग प्रमुख त्यांच्या निर्णयानूसार 100 टक्के उपस्थिती अनिवार्य राहील. विद्युत ,पाणी, बँक व्यवहार आणि इतर आर्थिक सेवेशी संबंधित शासकीय कार्यालये, शासकीय महामंडळे पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील, सर्व शासकीय कार्यालये अथवा शासकीय महामंडळे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांची बैठक ऑनलाइन घेण्यात यावी, कोणत्याही शासकीय कार्यालये अथवा शासकीय महामंडळे येथे अभ्यागतांना प्रवेश बंद राहील, यासाठी ऑनलाईन सेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, शासकीय कार्यालयाबाबत अपवादात्मक परिस्थितीत या शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख यांच्या परवानगीने 48 तासांच्या आतील निगेटिव्ह rt-pcr प्रमाणपत्र असल्यास, अभ्यागतांसाठी पास देऊन प्रवेश देता येईल, भारत सरकारकडील निर्देशानुसार खासगी आणि सरकारी कार्यालयातील सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणेकरून covid-19 विषाणू संसर्गाची भीती न बाळगता शासनास कार्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेणे सोयीस्कर होईल.

            खाजगी वाहतूक व्यवस्था – खाजगी वाहने तसेच खाजगी बससेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळीमध्ये सुरू राहतील आणि अत्यावश्यक सेवा अथवा निकडीच्या वेळी उर्वरित कालावधीसाठी म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 ते सकाळी 7.00 पर्यंत आणि शुक्रवार रात्री 8.00 सोमवार सकाळी 7.00 वाजेपर्यंत सुरू राहतील, खासगी बस यांनी पुढील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल – खाजगी बसमधून बसण्याच्या क्षमतेचे इतकेच प्रवासी प्रवास करु शकतील, उभा राहून एकाही प्रवाशाला प्रवास करण्यास परवानगी असणार नाही, भारत सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्व खासगी वाहतूक व्यवस्थेमध्ये चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल त्या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे, लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्टचे प्रमाणपत्र पंधरा दिवसांसाठी वैध असलेले जवळ बाळगणे आवश्यक राहील, सदरचा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.

            मनोरंजन आणि करमणूक विषयक – सिनेमा हॉल बंद राहतील, नाट्यगृह आणि प्रेक्षागृह बंद राहतील, मनोरंजन पार्क, आर्केस्ट्रा, व्हिडिओ गेम्स पार्लर बंद राहतील, वॉटर पार्क बंद राहतील, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रीडा संकुले बंद राहतील, भारत सरकारकडील निर्देशानुसार वरील अस्थापनाशी निगडित व्यक्ती, कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावेत जेणेकरून covid-19 विषाणू संसर्गाची भीती न बाळगता शासनास कार्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेणे सोयीस्कर होईल, चित्रपट मालिका, जाहिराती यांचे चित्रीकरणास पुढील अटींवर परवानगी असेल – मोठ्या संख्येने कलाकार एकत्र येतील अशा प्रकारच्या दृष्यांचे  चित्रीकरण करण्यास प्रतिबंध असेल, चित्रीकरणाशी निगडित सर्व कामगार वर्ग, कलाकार या सर्वांना पंधरा दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील, सदरचा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल, कलाकार आणि संबंधित कामगार यांच्यासाठी क्वारंटाईन बबल तयार करण्यात आलेस, सदर क्वारंटाईन बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर केल्यानंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येईल.

            रेस्टॉरंट बार आणि हॉटेल्स विषयक –  हॉटेलच्या आतील आवारामध्ये असलेले रेस्टॉरन्ट आणि बार वगळता सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेपर्यंत पार्सल सुविधा, घरपोच सेवा, टेकअवे सुविधा सुरू राहतील, शनिवार व रविवार या दिवशी फक्त घरपोच पार्सल सेवा सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि कोणत्याही नागरिकास या सेवा घेण्यासाठी कोणतेही रेस्टॉरन्ट आणि बार या ठिकाणी जाता येणार नाही, हॉटेलमध्ये उतरलेल्या प्रवाशांसाठी फक्त हॉटेलमधील रेस्टॉरंट बार सुरू राहतील, कोणत्याही परिस्थितीत बाहेरील प्रवाशांसाठी या सेवेचा लाभ देता येणार नाही, बाहेरील प्रवाशांसाठी वर नमूद केलेले रेस्टॉरन्ट आणि बारसाठीही प्रतिबंधाचे पालन केले जाईल, भारत सरकारकडील निर्देशानुसार घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, लसीकरण झाले नसल्यास सर्वांनी पंधरा दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील, सदरचा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल, rt-pcr टेस्ट प्रमाणपत्र किंवा लसीकरण केले नाही अशा कामगार वर्गाने घरपोच सेवा दिल्यास त्यांना 10 एप्रिल 2021 पासून सदर नियमाचा भंग केल्याबद्दल रक्कम रुपये 1 हजार दंड आणि संबधित आस्थापनाकडून रक्कम रुपये 10 हजार दंड आकारला जाईल, भारत सरकारकडील निर्देशानुसार आस्थापनांमध्ये काम करणारी व्यक्ती कामगार वर्ग या सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणेकरून covid-19 विषाणू संसर्गाची भीती न बाळगता शासनास रेस्टॉरन्ट आणि बार सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोयीस्कर होईल.

            धार्मिक, प्रार्थना स्थळे – सर्वधर्मीय धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील, सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारिक आणि धार्मिक सेवा करता, येतील परंतु त्या वेळी कोणत्याही बाहेरील भक्तांना प्रवेश असणार नाही, भारत सरकारकडील निर्देशानुसार धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये सेवा देणारे सेवेकरी यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणेकरून covid-19 विषाणू संसर्गाची भीती न बाळगता शासना धार्मिक, प्रार्थनास्थळे सुरू करण्याबाबत निर्णय घेणे सोयीस्कर होईल.

            केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर – सर्व केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील, भारत सरकारकडील निर्देशानुसार सर्व केशकर्तनालय दुकान, स्पा, सलून, ब्युटी पार्लर मधील कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, जेणेकरून covid-19 विषाणू संसर्गाची भीती न बाळगता शासन सर्व केशकर्तनालय दुकान, स्पा, सलून, ब्युटी पार्लर सुरू करणे बाबत निर्णय घेणे सोयीस्कर होईल.

            वृत्तपत्र संबंधित – सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहिल, वृत्तपत्रांची घरपोच सेवा ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेत करता येईल. भारत सरकारकडील निर्देशानुसार सर्व वृत्तपत्रांमध्ये कामगार वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे, वृत्तपत्रांची घरपोच सेवा देणाऱ्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची 15 दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे निगेटीव्ही प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू राहील.

            शाळा आणि महाविद्यालये –  सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद राहतील, वरील नियमामधून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट असेल, परीक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी लसीकरण करून घेणे किंवा 48 तासांपर्यंत वैध असलेले करणाचे rt-pcr टेस्ट प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील, महाराष्ट्र राज्या बाहेरील कोणत्याही परीक्षा मंडळ विद्यापीठ अथवा प्राधिकरणकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणताही त्रास होऊन न देता स्थानिक आपत्ती प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन परीक्षा देता येतील, सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील, भारत सरकारकडील निर्देशांनुसार वरील नमूद अस्थापनामधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर वर्ग यांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे जेणेकरून covid-19 विषाणू संसर्गाची भीती न बाळगता शासनास सर्व शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत निर्णय घेणे सोयीस्कर होईल.

            धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम – कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना परवानगी असणार नाही, ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रस्तावित असतील त्या ठिकाणी राजकीय सभा मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी देण्यात येईल, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधित राजकीय मेळावे, सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी 50 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृह बैठक क्षमतेच्या 50 टक्केच्या अधीन राहून आणि खुल्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 टक्केच्या अधीन राहून, सर्व covid-19 शिष्टाचाराचे पालन केले जाईल या अटीवर परवानगी देण्यात येईल, संबंधित सर्वांनी देण्यात आलेल्या राजकीय सभा मेळावे संबंधित क्षेत्राचे अधिकारी यांच्यामार्फत योग्य नियमाचे पालन केले जात असल्याची खात्री केली जाईल, सदर ठिकाणी covid-19 शिष्टाचाराचे उल्लंघन झालेस संबंधित ठिकाणचे जागामालक यासाठी जबाबदार राहील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार दंडास पात्र राहतील, गंभीर प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर ठिकाण covid-19 संसर्ग संपेपर्यंत बंद राहील, एखाद्या उमेदवाराच्या दोन पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्यामध्ये सदर बाबींचे उल्लंघन झालेस पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही, कोणत्या प्रकारच्या मिरवणूका, कोपरा सभा या ठिकाणी covid-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल, वरील सर्व मार्गदर्शन सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांसाठी समान राहतील, तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत याविषयी दक्षता घेणे. लग्न समारंभामध्ये जास्तीत जास्त पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल, लग्न समारंभामध्ये येणाऱ्या या अभ्यागतांसाठी सेवा देणाऱ्या सर्व कामगार वर्गांचे लसीकरण करणे बंधनकारक असेल आणि जोपर्यंत लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत कोरोनाचे निगेटीव्ह rt-pcr टेस्ट प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील, निगेटीव्ह rt-pcr टेस्ट प्रमाणपत्र व लसीकरण केले नाही अशी सेवा देणारी व्यक्ती निदर्शनास आल्यास त्यास रक्कम रुपये 1 हजार दंड आकारला जाईल आणि संबंधित आस्थापना मालकास रुपये 10 हजार दंड आकारला जाईल, लग्नसमारंभ आयोजित केले जात असलेल्या हॉलच्या परिसरामध्ये पुन्हा पुन्हा उल्लंघन झालेस सदर परिसर हा सील केला जाईल, तसेच सदर ठिकाणी दिलेल्या परवानग्या covid-19 अधिसूचना संपेपर्यंत रद्द केल्या जातील. अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी असेल, सदर अंत्यविधीचे ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण करावे, सदर कर्मचाऱ्यांस कोरोनाचे निगेटीव्ह rt-pcr टेस्ट प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील.

            रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते –  रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना त्याच ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास देऊ नयेत, फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेत सर्व दिवशी सुरू ठेवाव्यात, प्रतिक्षाधीन ग्राहकांना काउंटरपासून दूर अंतरावर सामाजिक अंतर राखून उभे करावे, सदर आदेशाचा भंग करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर साथरोग संपूर्ण संपेपर्यंत बंद ठेवण्याची कार्यवाही करावी, ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यांनी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करून घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत निगेटीव्ह rt-pcr चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे, त्याची मुदत पंधरा दिवसांची असेल. सदर नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल, स्थानिक प्रशासनाने सदर विक्रेत्यावर प्रत्यक्ष किंवा सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवावे, जे विक्रेते आणि ग्राहक सदर covid-19 प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयक नियमांचे उल्लंघन करतील ते दंडनीय कारवाई पात्र राहतील, जर विक्रेते पुन्हा पुन्हा नियमाचे उल्लंघन करत असल्याची स्थानिक प्रशासनाची खात्री झाल्यास व सदर विक्रेते दंड करून ही नियमाचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर निलंबनाचे किंवा साथ रोग आटोक्यात येईपर्यंत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात यावी.

            उत्पादन क्षेत्र – पुढील अटींच्या अधीन राहून उत्पादन क्षेत्र सुरू राहील, कारखाना, उत्पादन अस्थापना यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तापमान तपासूनच प्रवेश द्यावा, सर्व कर्मचारी, व्यवस्थापन व त्यांच प्रमाणे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करून घ्यावे, जर एखादा कर्मचारी, मंजूर सकारात्मक आढळला तर त्यांच्यासोबत निकट संपर्कात आलेल्या इतर कर्मचारी, मजूर यांना पगारी रजा देऊन त्यांचे अलगीकरण करण्यात यावे, ज्या कारखान्यात आस्थापनेत 500 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असतील अशा कारखान्यांनी, आस्थापनांनी त्यांचे स्वतःचे अलगीकरण केंद्र स्थापन करावे, जर एखादा कर्मचारी सकारात्मक आढळल्यास सदर आस्थापनेचे संपूर्ण निर्जंतुकीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत सदर आस्थापना बंद ठेवण्यात यावी, जेवण व चहाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्यात याव्यात, जेणेकरून गर्दी होणार नाही, तसेच एकत्र बसून जेवण करण्यास मनाई असेल, सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे, सर्व कामगारांचे भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करून घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक rt-pcr चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे, त्यांची मुदत पंधरा दिवस असेल, सदर नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल, जर एखादा कामगार सकारात्मक असल्यास त्याला वैद्यकीय रजा देण्यात यावी व त्याला कामावर गैरहजर कारणास्तव  कामावरून कमी करता येणार नाही, सदर कामगार यास पूर्ण पगारी वेतन देण्यात यावे.

            ऑक्सीजन उत्पादन – सर्व औद्योगिक आस्थापनांना दिनांक 10 एप्रिल 2021 नंतर ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही, तथापी योग्य कारणास्तव त्यांचे परवाना प्राधिकरणाकडून पूर्व परवानगी घेऊन वापर करता येईल, सर्व परवाना प्राधिकाऱ्यांनी अशा आस्थापनाकडील दिनांक 10 एप्रिल 2021 नंतर ऑक्सिजनचा वापर थांबवावा किंवा त्यांची पूर्व परवानगी घ्यावी, सर्व ऑक्सीजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या उत्पादनापैकी 80 टक्के ऑक्सीजन साठा हा वैद्यकीय व औषध निर्मितीसाठीच राखीव ठेवण्याचा आहे, त्यांनी त्यांच्या ग्राहकांची नावे दिनांक 10 एप्रिल 2021 पासून प्रसिद्ध करावेत.

            ई-कॉमर्स – ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यांनी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करून घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक rt-pcr चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे सदर नियम 10 एप्रिल 2019 पासून लागू होईल, सदर आदेशाचा भंग करणाऱ्या आस्थापनांचा परवाना covid-19 प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत निलंबित करण्यात येईल.

            सहकारी गृहनिर्माण संस्था – कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्थेत एकावेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृहनिर्माण संस्था सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल, अशा गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांना प्रवेश बंदी असल्याबाबतचा फलक लावणे बंधनकारक असेल, सोसायट्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये कोणत्याही नागरीकांचा प्रवेश व बाहेर जाणे याबाबत सोसायटीमार्फत प्रतिबंध करण्याचा आहे, जर एखाद्या गृहनिर्माण संस्थेने नमूद निर्देशांचा भंग केल्यास पहिल्या वेळेस रक्कम रुपये 10 हजार दंड करण्यात येईल व दुसऱ्या वेळेस त्या पेक्षा जास्त दंड तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळोवेळी ठरविलेल्या प्रमाणे आकारण्यात येईल, सदर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेचा वापर हा सोसायटीमध्ये मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कामगारांच्या पगारासाठी करण्यात येईल, सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या संस्थेत वेळोवेळी येणाऱ्या व्यक्तींची, ते जोपर्यंत लस घेत नाहीत तोपर्यंत rt-pcr चाचणी शासकीय निर्देशानुसार करावी.

            बांधकाम व्यवसाय – ज्या बांधकाम क्षेत्रात बांधकामाशी संबंधित कर्मचारी मजूर यांना त्याच ठिकाणी राहण्याची सोय आहे अशा बांधकाम व्यवसायास परवानगी असेल, अशा ठिकाणी साधनसामग्री वाहतुकी व्यतिरिक्त कामगार व इतर वाहतुकीस परवानगी असणार नाही, ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यांनी भारत सरकारच्या निकषानुसार लसीकरण तात्काळ करून घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे, सदर नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल, नियमाचे भंग करणाऱ्या बांधकाम व्यवसायीकास रक्कम रुपये 10 हजार दंड आकारण्यात येईल, तसेच पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन झाल्यास सदर बांधकामाचे ठिकाण हे covid-19 संसर्ग कमी होत नाही तोपर्यंत बंद करण्यात येईल, एखादा कामगार हा covid-19 विषाणू पॉजिटीव्ह आढळून आल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी, त्याला कामावर गैरहजर कारणास्तव कामावरून कमी करता येणार नाही, सदर कामगार यास पूर्ण पगारी वेतन देण्यात यावे.

            दंड निहाय कारवाई – यापूर्वी या कार्यालयाकडून पारित करण्यात आलेले दंड निहाय आदेश या आदेशास संलग्न असून ते यापुढे कायम राहतील, जमा होणाऱ्या दंडाची रक्कम संबंधित प्राधिकरणाकडे जमा करण्यात येईल, सदर दंडाच्या रकमेचा वापर covid-19 प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी वापरण्यात येईल, सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 5 एप्रिल 2021 रात्री 8.00 वाजल्यापासून ते दिनांक 30 एप्रिल 2021 रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहील, उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याचे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा