You are currently viewing महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 जारी

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 जारी

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा -2020 ही रविवार दिनांक 11 एप्रिल  2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00  या वेळेत घेण्यात येणार आहे. कणकवली कॉलेज कणकवली (जुनी इमारत),कणकवली कॉलेज कणकवली नवीन इमारत, एस.एम. हायस्कूल कणकवली, विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली,  या उपकेंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

           या परीक्षेस येताना विद्यार्थ्यांनी पुढील साहित्या सोबत आणावे. काळ्या शाईचे बॉल पॉईंट ,पेन व पेन्सिल व आयोगाने परवानगी दिलेले साहित्य, प्रवेश पत्र आणणे अनिवार्य आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट,पॅनकार्ड किंवा स्मार्क कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स या पैकी किमान एक मूळ ओळखपत्र व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी,

          परीक्षा केंद्रावर पुढील साहित्य आणू नये. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधन म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोट्स, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, पॅड, पाऊच, परिगणक इत्यादी प्रकारचे साहित्य, साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास व बाळगण्यास मनाई आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेच्या किमान एक तास आधी उपस्थित रहावे.

          सदरची परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपक सकाळी 8.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत बंद ठेवण्यात यावीत. तसेच परीक्षेच्या उपकेंद्रावर व आवारात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश देण्यात येणार नाही. याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी, कणकवली यांच्या मार्फत मनाई आदेश लागू करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =