You are currently viewing कोट्यवधीचा हिशोब नको, मराठवाड्याला  फक्त 500 व्हेंटीलेटर द्या…

कोट्यवधीचा हिशोब नको, मराठवाड्याला फक्त 500 व्हेंटीलेटर द्या…

चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांना टोला

औरंगाबाद

कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्य योजनावर बंधन आणण्यात आली. कंपन्या व उद्योजकांतर्फे कोरोनाच्या संसर्ग उपाय-योजना कमी करण्यासाठी देण्यात येणारी सर्व मदत पंतप्रधान रिलीफ फंडात टाकावी असे सांगण्यात आले. महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपयांचा निधी या रिलीफ फंडात अनेकांनी दिले आहे. या हजारो कोट्यवधींचा हिशोब नको, फक्त मराठवाड्याला ५०० वेंटिलेटर द्या, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावेत असा टोलाही लगावला.

मराठवाड्यातील व्हेंटिलेटर व ऑक्सीजन टंचाई विषयी अनेकजण आवाज उठवत आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा