You are currently viewing लिलाविश फाउंडेशनची कासार्डे विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना अडीच लाखाची शिष्यवृत्ती

लिलाविश फाउंडेशनची कासार्डे विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना अडीच लाखाची शिष्यवृत्ती

मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न

तळेरे

लीलाविश फाउंडेशनच्या वतीने कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी २लाख ५०हजार रुपये शिष्यवृत्तीचे वितरण स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व फौऊडेशनचे प्रतिनिधी प्रकाश उर्फ बबन नारकर यांच्याच्यासह अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटी चेअरमन मधुकर खाडये,विद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही.नारकर, पियाळीतील सामाजिक कार्यकर्ते बबन नारकर, जेष्ठ शिक्षक एन.सी.कुचेकर, सौ.बी.बी.बिसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
लीलाविश फाउंडेशनचे संचालक महेश विश्राम नारकर, राजेश विश्राम नारकर यांनी कासार्डे,पियाळीसारख्या ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी कासार्डे माध्यमिक विद्यालयाची निवड केली आहे.
गतवर्षी याच लीलाविश फौंडेशनच्या माध्यमातून कासार्डे विद्यालयातील इ.५वी ते इ. १०वी मधील ३१गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना १लाख ५५हजार रू.शिष्यवृत्तीचे वाटप केले होते.
यावर्षी इ.५वी ते.इ.१२ वी तील गरीब व होतकरू निवडक ५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे तब्बल २ लाख ५० हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्या दरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, चेअरमन मधुकर खाडये,प्राचार्य आर.व्ही. नारकर,लीलाविस फाउंडेशनचे प्रतिनिधी बबन नारकर यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत लिलाविश फाऊंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक करून धन्यवाद दिले.
विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक कार्यासाठी सत्ककारणी लावावी व शैक्षणिक प्रगतीची वाटचाल अशीच पुढे सुरु ठेवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना लीलाविस फौऊनडेशनचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.बी‌.बी.बिसुरे यांनी केले. या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याला विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकवृंदही फिजिकल डिस्टंसिंग ठेवून उपस्थित होते.

पियाळी गावाच्या दानशुर सुपुत्राची मातृभुमिसाठी तळमळ-

मुळ पियाळी गावाचे सुपुत्र असलेले फौउडेशनचे संचालक महेश विश्राम नारकर, राजेश विश्राम नारकर या बंधुनी आपल्या मातृभुमितील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी लिलाविश फौंउडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. यापुढे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी आपण असेच कार्यरत राहणार आहोत अशी प्रतिक्रिया लीलाविश फाऊंडेशनचे सर्वेसर्वा राजेश नारकर यांनी आमच्या प्रतिनिधीला फोनवरून बोलताना दिली.

 

कासार्डे: कासार्डे विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक, लीलावीस फौंडेशनचे प्रतिनिधी, व शिक्षक वृंद
छाया:

प्रतिक्रिया व्यक्त करा