वेंगुर्ले येथे कार-दुचाकी अपघात; दोघे जखमी

वेंगुर्ले येथे कार-दुचाकी अपघात; दोघे जखमी

वेंगुर्ला
रामघाट रोड येथे वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य रस्त्यावरील उतारावर अल्टो कार चालक व दुचाकीस्वार जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलवण्यात आल्याची माहिती परबवाडा ग्रा पं सदस्य हेमंत गावडे यांनी दिली.
कार चालकाच्या गाडीवरून ताबा सुटून हा अपघात झाला यात कार पलटी होऊन मोठे नुकसान झाले तर दुचाकीचे ही नुकसान झाले आहे. दुचाकी स्वार शमा देसाई रा. परबवाडा आपल्या पत्नीसहित सावंतवाडी दिशेने येत असताना हा अपघात झाला यावेळी तात्काळ हेमंत गावडे व भूषण आंगचेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीस १०८ रुग्णवाहिकेने कुडाळ येथे पाठवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा