You are currently viewing जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांनी घेतली कोरोना लस…

जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांनी घेतली कोरोना लस…

सर्व पत्रकारांना टप्या टप्याने देणार लस -: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील

सिंधुदुर्गनगरी

कोरोना काळात अविरतपणे फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकारांना जिल्हा रुग्णालयामध्ये रविवारी लस देण्यात आली. दरम्यान 45 वर्षावरील सर्व पत्रकारांना टप्या टप्याने लस देण्याची व्यवस्था केली जाईल असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी यावेळी सांगितले जिल्हा रुग्णालय व जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्या पुढाकाराने जिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर जिल्हा मुख्यालयातील 45 वर्षावरील पत्रकारांना लस देण्यात आली यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, सचिव नंदकुमार आयरे,सहसचिव सतीश हरमलकर,जेष्ठ पत्रकार शेखर सामंत, संदीप गावडे, विनोद परब व इतर कर्मचारी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आज पर्यत जिल्हा आरोग्य यंत्रणेबरोबरच मुख्यालयातील सर्व पत्रकार अविरतपणे फ्रंट लाईनवर काम करीत आहेत त्यामुळे पत्रकारांच्याही आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मुख्यालयातील पत्रकारांना रविवारी कोरोना लस देण्यात आली आणि मुख्यालय पत्रकारांच्या मागणी प्रमाणे जिल्ह्यातील इतर 45 वर्षावरील पत्रकारानाही टप्याटप्याने कोरोना लस देण्याची व्यवस्था केली जाईल असे डॉ श्रीपाद पाटील यांनी सांगितले कोरोना लसीकरणासाठी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे,डॉ दुर्गावाडकर व जिल्हा रुग्णालयीन कर्मचऱ्यानी सहकार्य केले

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =