सेनेच्या उमेदवार रेश्मा नाईक यांचा पराभव
सावंतवाडी
सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या सौ. निकिता सावंत यांची निवड झाली. सभापती पदासाठी झालेल्या निवडणूकीत निकिता सावंत यांनी सेनेच्या उमेदवार रेश्मा नाईक यांचा दारुण पराभव केला. निकिता सावंत यांना एकूण १३ मते मिळाली तर रेश्मा नाईक यांना केवळ ५ मते मिळाली. काँग्रेसचे मत सेनेच्या पारड्यात पडले.
पंचायत समिती सभागृहात झालेल्या या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी काम पाहिले. निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी सभापती निकिता सावंत यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, नगराध्यक्ष संजू परब, तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, तालुका मंडल अध्यक्ष तथा पं.स. सदस्य संदीप गावडे, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, शितल राऊळ, माजी सभापती तथा पं.स. सदस्य रविंद्र मडगावकर, पंकज पेडणेकर, मानसी धुरी, गौरी पावसकर, माजी उपसभापती नेमळेकर, पं.स. सदस्य बाबू सावंत, श्रुतिका बागकर, अक्षया खडपे, प्राजक्ता केळुसकर, बांदा सरपंच अक्रम खान, मनोज नाईक, शेखर गांवकर, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, नेमळे सरपंच विनोद राऊळ, मकरंद तोरस्कर, जावेद खतिब, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.