सावंतवाडीत सभापतीपदासाठी निकिता सावंत, रेश्मा नाईक आमने-सामने…

सावंतवाडीत सभापतीपदासाठी निकिता सावंत, रेश्मा नाईक आमने-सामने…

पंचायत समिती निवडणूक; भाजपासह शिवसेनेकडून अर्ज दाखल…

पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निकिता सावंत यांचा तर शिवसेनेकडून रेश्मा नाईक यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. त्यामुळे आता सावंतवाडी पंचायत समितीचा सभापती कोण?, याबाबतची अधिकृत घोषणा दुपारी होणार आहे.
येथील पंचायत समितीची सभापतीची निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज सुरू आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा