बांदा
बेसुमार खतांच्या वापरामुळे जमीन दिवसेंदिवस नापीक बनत चालली आहे अधिक उत्पन्नाच्या आशेने शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतो याचा विपरीत परिणाम म्हणजे मनुष्याच्या आरोग्यावर होत आहे त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताद्वारे शेती करून स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवावे असे प्रतिपादन मायबा कंपनीचे संचालक स्वप्निल तेजम यांनी केले. पाडलोस ग्रामपंचायत व केणीवाडा येथे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आयोजित शिबिरात ते बोलत होते.
व्यासपीठावर पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, टिम मेंबर प्रिया गावडे, वैष्णवी कुडाळकर, ज्योती गावडे, नेहा नाईक तसेच ग्रा.पं.माजी सदस्य नंदा गावडे शेतकरी रामचंद्र गावडे, गोविंद माधव, दत्ताराम गावडे आदी शेतकरी उपस्थित होते. श्री तेजम पुढे म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण भू मातेचे रक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे कचरा पालापाचोळा गवत असे कुजणारे पदार्थ आम्ही विकत घेऊ त्यापासून सीएनजी गॅस, सेंद्रिय खत, वीज तयार करण्याचा मानस आहे.
स्वच्छ जैव इंधन(सीएनजी), सेंद्रीय शेती, रोजगार निर्मिती, आधुनिक शेती तंत्रज्ञान, ग्राम स्वच्छता ही पाच उद्दीष्टे मायबा कंपनीची असल्याचे स्वप्निल तेजम म्हणाले. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेंद्रीय खताच्या वापरामुळे मातीची सुपीकता कायम राहील व पडीक जमीन लागवडीखाली येईल. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे अनेक आजारांवर आळा बसतो व शेतीमालाची प्रत सुधारते. हत्ती गवतापासून होणारे फायदे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तराच्या चर्चेत सहभाग घेतला. समाधानकारक उत्तरे मिळाल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
केणीवाडा येथे मार्गदर्शनवेळी सिंधु कोकण दुग्ध संस्था पाडलोसचे अध्यक्ष अर्जुन कुबल, उपाध्यक्ष हर्षद परब, सचिव आनंद कुबल, शेतकरी अनंत नाईक, अमोल नाईक, पपु कुबल, भूषण केणी, समीर नाईक, भास्कर नाईक, विष्णू नाईक, आनंद कोरगावकर, शशिकांत नाईक, राकेश सातार्डेकर, गणपत पराडकर आदी उपस्थित होते.