सहा कारचा विचित्र अपघात

सहा कारचा विचित्र अपघात

एकजण जखमी; तासभर वाहतूक विस्कळीत

नवी मुंबई

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कामोठे उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच सहा कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एक व्यक्ती किरोकोळ जखमी असून वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी जात एका तासात वाहतूक सुरळीत केली.

मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शीव-पनवेल महामार्गावर मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर कामोठे येथे हा अपघात झाला. पुढे असणाऱ्या कारने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या पाच कार एकमेकांवर आदळल्या. यात सर्वच कारचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या कारमधील मागील आसनावर बसलेला एकजण किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केली.

मात्र तोपर्यंत मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. कळंबोली सर्कलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र तासात वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा